Thursday, 3 January 2013

Kavita ...

दिल्ली मध्ये सामुहिक बलात्कारची बळी ठरलेल्या मुली बद्दल अमिताभ बच्चन ह्यांनी हिंदी मध्ये लिहिलेल्या कवितेचे मराठी रुपांतर करून संपूर्ण महाराष्ट्र तर्फे हि कविता त्या मुलीला अर्पण करण्यात येत आहे, .......
तिचं दुखं समजून घेऊन ती गेल्यानंतर तिच्या आईसाठी व भारतासाठी तिचा संदेश ह्या कवितेतून मांडण्यात आला आहे :-
आई ....
खूप दुखं सहन करून, खूप दुखं देऊन ...
तुला काही सांगून ...... मी जात आहे,
आज माझ्या अंतयात्रेला मैत्रिणी माझ्या भेटायला येतील पांढर्या कापडात गुंढाळलेली मला
बघून जिवंतपणीच मरून जातील
आणि मुलीचा जन्म मिळाल्यामुळे
पुन्हा एकदा दुखं करतील
आई तू त्यांना एवढच सांग .....
राक्षसांच्या दुनियेत जपून वाग
राखी साठी दादाचा हाथ रिकामा राहील .......
माझी आठवण काढून डोळे तो भरून आणील
कपाळावर त्याच्या टिळा लावायला जीव
माझाही कासावीस होईल ..........
आई तू दादाला रडू देऊ नकोस ...
क्षणाक्षणाला मी बरोबर असल्याचा विश्वास
गमावून देऊ नकोस
आई.... बाबा पण एकटे एकटे खूप रडतील .....
मी काहीच करू नाही शकलो अस म्हणून त्रास करून घेतील
आई...हे दुखं त्यांना होऊन देऊ नकोस .......
स्वतः वर कोणताही आळ घेऊन देऊ नकोस
आई तुझ्या साठी मी काय बोलू ......
दुखाला तुझ्या शब्दांमध्ये कसे तोलू ????
आई लोक तुला सतावतील .......
मला जन्म देण्याची शिक्षा तुझ्या कपाळी लावतील
आई सगळ सहन कर .............
पण, अस नको म्हणूस .... " देवा पुढच्या वेळेस
माझ्या पोटी मुलगी नको देउस "