सांगना
ग ताई मला,,,,,,,,
सांगना ग ताई मला
सांगना ग ताई ?
कधी ग परत येणार
आपले बाबा नी आई ?
आजी बोलली मला
ते देवा घरी गेले
मग अजुन पुन्हा
का ग परत नाही आले ?
आहे का ग माहित तुला
देवाच घर
कर ना ग फोन
त्याच्या फोन वर
मला माझ्या आईशी
खुप काही बोलायचय
देव बप्पाशी त्या खुप खुप
भांडायचय
कारे बप्पा ?
आई बाबाना ठेउन तू घेतोस
आम्हाला एकट्याला सोडून
काय मज्जा पाहतोस ?
आम्हाला त्यांच्या शिवाय
कोनच नाही
आम्ही उपाशी असलो तरी
कोण जेउ घालत नाही
शाले मधे मला
रोज मारतात बाई
अश्रु पुसणार आमच
कोनच नाही
नको मला चोंकलेट
नको मला गाडी
तुमच्या शिवाय मला
कोणाची गरज नाही
नाही देणार त्रास बाबांना ,
उलट नाही बोलणार आई
सांग ना ग ताई मला सांग ना ग ताई
कधी ग येणार परत आपले बाबा नी आई
आपले बाबा नी आई ?
( आई ईईईईईइ .... मला नाही करमत येना परत मला सोडून नको जाऊ ना .......उ उ ऊऊऊउ )
कवी :- विनोद आप्पासाहेब शिंदे
No comments:
Post a Comment