Monday, 15 April 2013

आईच कर्ज...

मुलगा शिकूण सवरून  खूप  मोठा  झाला.
वडीलांच्या निधनानंतर आईनेच खुप कष्ट करून त्याला शिकवलं. लग्नानंतर त्याच्या पत्नीला त्याची आई अडचन वाटायला लागली. तीला नेहमी वाटायचं सासू आपल्या status ला फीट नाही होत.  लोकांना सांगताना तीला नेहमी संकोच होत होता की ू ही अडाणी  गावंढल तीची सासू आहे.
मग पुढे काही दिवसांनी मुलाने आईला विचारले."आई, मी आता ह्या काबिल झालो आहे की कोनतंही कर्ज फेडू शकतो.
मी आणि तू दोघे सुखी राहण्यासाठी आज तू मला केलेल्या आजपर्यंतचा सर्व खर्च व्याजासकट सांग.ते मी तूला देईन. मग आपण वेगवेगळ राहू.
आईने जरा विचार करून  उत्तर दिलं." लेका हिशोब खूप मोठा आहे विचार करून  सांगेन.  मला जरा  वेळ  दे."
मूलगा: आई काही घाई नाही,  दोन चार दिवसांत सांग.
रात्र झाली सगले झोपले, आईने एका लोट्यात पाणी घेतलं आणि मुलाच्या खोलीत जाऊन त्याच्या एका बाजूस ओतलं, त्याने दुसय्रा बाजूस तोंड केल आई ने त्या बाजूसही पाणी ओतलं..हे सारख चालू होतं.
मूलगा तावातावाने उठला आणि रागाने त्याने आईला विचारले.."आई हे काय माझं अंथरून ओलं का केलस.
आई बोलली "लेका तूच तर म्हणाला होतसना पूर्ण आयुश्याचा हिशोब करून ठेव. मी हेच हिशोब लावत होती की मी कित्तेक रात्र तुझ्या बाळपनीत तू अंथरून ओल करायचस तेव्हा मी  रात्र जागून काढायचे. ही तर पहिली रात्र आहे आणि तू आत्ताच घाबरलास.? मी तर अजून हिशोब पण सूरू नाय केल  जे तू फेडशील.
आईच हे बोलनं ऎकून मुलाला त्या रात्री झोपच  लागली.नाही त्याला कळूनआल की आईचं कर्ज आजीवन नाही फेडू शकत.
आई आपल्या बाळासाठी दु:ख सहन करते तर बाबा सदैव त्याच रक्षन करण्यास तत्पर असतात.
आई बाबांच कर्ज कधीचं फेडता येत नाही.आपण तर फक्त त्यांच कार्य पूढे नेत असतो. तेही  आपल्याच हितासाठी.
शेवटी आपण सुध्दा आपल्या मुलांकडून  हिच अपेक्षा ठेवनार ना.....?
लेख-अनु
ह्या page ला नक्की भेट द्या...
www.fb.com/aaibaba143

No comments:

Post a Comment