Showing posts with label आई तुझ प्रेम. Show all posts
Showing posts with label आई तुझ प्रेम. Show all posts

Monday, 15 April 2013

आईच कर्ज...

मुलगा शिकूण सवरून  खूप  मोठा  झाला.
वडीलांच्या निधनानंतर आईनेच खुप कष्ट करून त्याला शिकवलं. लग्नानंतर त्याच्या पत्नीला त्याची आई अडचन वाटायला लागली. तीला नेहमी वाटायचं सासू आपल्या status ला फीट नाही होत.  लोकांना सांगताना तीला नेहमी संकोच होत होता की ू ही अडाणी  गावंढल तीची सासू आहे.
मग पुढे काही दिवसांनी मुलाने आईला विचारले."आई, मी आता ह्या काबिल झालो आहे की कोनतंही कर्ज फेडू शकतो.
मी आणि तू दोघे सुखी राहण्यासाठी आज तू मला केलेल्या आजपर्यंतचा सर्व खर्च व्याजासकट सांग.ते मी तूला देईन. मग आपण वेगवेगळ राहू.
आईने जरा विचार करून  उत्तर दिलं." लेका हिशोब खूप मोठा आहे विचार करून  सांगेन.  मला जरा  वेळ  दे."
मूलगा: आई काही घाई नाही,  दोन चार दिवसांत सांग.
रात्र झाली सगले झोपले, आईने एका लोट्यात पाणी घेतलं आणि मुलाच्या खोलीत जाऊन त्याच्या एका बाजूस ओतलं, त्याने दुसय्रा बाजूस तोंड केल आई ने त्या बाजूसही पाणी ओतलं..हे सारख चालू होतं.
मूलगा तावातावाने उठला आणि रागाने त्याने आईला विचारले.."आई हे काय माझं अंथरून ओलं का केलस.
आई बोलली "लेका तूच तर म्हणाला होतसना पूर्ण आयुश्याचा हिशोब करून ठेव. मी हेच हिशोब लावत होती की मी कित्तेक रात्र तुझ्या बाळपनीत तू अंथरून ओल करायचस तेव्हा मी  रात्र जागून काढायचे. ही तर पहिली रात्र आहे आणि तू आत्ताच घाबरलास.? मी तर अजून हिशोब पण सूरू नाय केल  जे तू फेडशील.
आईच हे बोलनं ऎकून मुलाला त्या रात्री झोपच  लागली.नाही त्याला कळूनआल की आईचं कर्ज आजीवन नाही फेडू शकत.
आई आपल्या बाळासाठी दु:ख सहन करते तर बाबा सदैव त्याच रक्षन करण्यास तत्पर असतात.
आई बाबांच कर्ज कधीचं फेडता येत नाही.आपण तर फक्त त्यांच कार्य पूढे नेत असतो. तेही  आपल्याच हितासाठी.
शेवटी आपण सुध्दा आपल्या मुलांकडून  हिच अपेक्षा ठेवनार ना.....?
लेख-अनु
ह्या page ला नक्की भेट द्या...
www.fb.com/aaibaba143
ु

Monday, 22 October 2012

सांगना ग ताई मला,,,,,,,,


सांगना ग ताई मला,,,,,,,,
 
सांगना ग ताई मला
सांगना ग ताई ?
कधी ग परत येणार
आपले बाबा नी आई ?

आजी बोलली मला
ते देवा घरी गेले
मग अजुन पुन्हा
का ग परत नाही आले ?

आहे का ग माहित तुला
देवाच घर
कर ना ग फोन
त्याच्या फोन वर
मला माझ्या आईशी
खुप काही बोलायचय
देव बप्पाशी त्या खुप खुप
भांडायचय
कारे बप्पा ?
आई बाबाना ठेउन तू घेतोस
आम्हाला एकट्याला सोडून
काय मज्जा पाहतोस ?
आम्हाला त्यांच्या शिवाय
कोनच नाही
आम्ही उपाशी असलो तरी
कोण जेउ घालत नाही
शाले मधे मला
रोज मारतात बाई
अश्रु पुसणार आमच
कोनच नाही
नको मला चोंकलेट
नको मला गाडी
तुमच्या शिवाय मला
कोणाची गरज नाही
नाही देणार त्रास बाबांना ,
उलट नाही बोलणार आई
सांग ना ग ताई मला सांग ना ग ताई
कधी ग येणार परत आपले बाबा नी आई
आपले बाबा नी आई ?


( आई ईईईईईइ .... मला नाही करमत येना परत मला सोडून नको जाऊ ना .......उ उ ऊऊऊउ )

कवी :- विनोद आप्पासाहेब शिंदे 



Thursday, 18 October 2012

आई बाबा Facebook पेज

  ♥आई बाबा(Aai Baba) Facebook पेज ... ♥



तुम्ही आहात ना फेसबूक वर मग वाट कसली  बघताय ...
ह्या पेजला भेट द्या .
हा पेज पाहण्या साठी येथे click करा .
हा पेज Join करण्यासाठी हा पेज open होताच Like करा ....♥

                                                            Thank you.........♥♥♥♥♥






















 


जादू (Magic post on facebook)
फेसबूक साठी म्याजिक  पोस्ट 

हा  code copy  करुन 
@+[235617359892314:0]
Comment  मध्ये  Paste  करा ...
"+" हा चिन्ह काढून टाका ...
आणि पाहा ...

Tuesday, 16 October 2012

आई म्हणजे........

आई  म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी  अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात  अस थंड पाणी    ..........


 चित्र  रुपात 

Thursday, 11 October 2012

माझ्या चुकांमुळे पुन्हा कधी

 


माझ्या चुकांमुळे पुन्हा कधी
डोळ्यात पाणी येऊ देणार नाही
होईल गर्व तुम्हाला ही एकदा
शरमेने मान खाली जाऊ देणार नाही


Tuesday, 25 September 2012

आई तुझ प्रेम

Aai Kiti Te Tujh Niswarth Prem
Hridayat Kiti Kappyat Saathu Mi
Kitinda Nava Hridayacha Sandesh 
Devakade Kshana Kshanala Magu Mi