Showing posts with label प्रेम. Show all posts
Showing posts with label प्रेम. Show all posts

Monday, 15 April 2013

आईच कर्ज...

मुलगा शिकूण सवरून  खूप  मोठा  झाला.
वडीलांच्या निधनानंतर आईनेच खुप कष्ट करून त्याला शिकवलं. लग्नानंतर त्याच्या पत्नीला त्याची आई अडचन वाटायला लागली. तीला नेहमी वाटायचं सासू आपल्या status ला फीट नाही होत.  लोकांना सांगताना तीला नेहमी संकोच होत होता की ू ही अडाणी  गावंढल तीची सासू आहे.
मग पुढे काही दिवसांनी मुलाने आईला विचारले."आई, मी आता ह्या काबिल झालो आहे की कोनतंही कर्ज फेडू शकतो.
मी आणि तू दोघे सुखी राहण्यासाठी आज तू मला केलेल्या आजपर्यंतचा सर्व खर्च व्याजासकट सांग.ते मी तूला देईन. मग आपण वेगवेगळ राहू.
आईने जरा विचार करून  उत्तर दिलं." लेका हिशोब खूप मोठा आहे विचार करून  सांगेन.  मला जरा  वेळ  दे."
मूलगा: आई काही घाई नाही,  दोन चार दिवसांत सांग.
रात्र झाली सगले झोपले, आईने एका लोट्यात पाणी घेतलं आणि मुलाच्या खोलीत जाऊन त्याच्या एका बाजूस ओतलं, त्याने दुसय्रा बाजूस तोंड केल आई ने त्या बाजूसही पाणी ओतलं..हे सारख चालू होतं.
मूलगा तावातावाने उठला आणि रागाने त्याने आईला विचारले.."आई हे काय माझं अंथरून ओलं का केलस.
आई बोलली "लेका तूच तर म्हणाला होतसना पूर्ण आयुश्याचा हिशोब करून ठेव. मी हेच हिशोब लावत होती की मी कित्तेक रात्र तुझ्या बाळपनीत तू अंथरून ओल करायचस तेव्हा मी  रात्र जागून काढायचे. ही तर पहिली रात्र आहे आणि तू आत्ताच घाबरलास.? मी तर अजून हिशोब पण सूरू नाय केल  जे तू फेडशील.
आईच हे बोलनं ऎकून मुलाला त्या रात्री झोपच  लागली.नाही त्याला कळूनआल की आईचं कर्ज आजीवन नाही फेडू शकत.
आई आपल्या बाळासाठी दु:ख सहन करते तर बाबा सदैव त्याच रक्षन करण्यास तत्पर असतात.
आई बाबांच कर्ज कधीचं फेडता येत नाही.आपण तर फक्त त्यांच कार्य पूढे नेत असतो. तेही  आपल्याच हितासाठी.
शेवटी आपण सुध्दा आपल्या मुलांकडून  हिच अपेक्षा ठेवनार ना.....?
लेख-अनु
ह्या page ला नक्की भेट द्या...
www.fb.com/aaibaba143

Friday, 26 October 2012

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....
 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले,

काही शब्द जाऊन माझ्या हृदयातच टोचले,
काही कठीण यातना झाल्या हृदयास माझ्या, 

पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले, 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....

प्रेमात तिच्या मी झालो एवढा वेडा,
प्रेमात मला मिळाला एक वेगळाच धडा,
... का माझ्या हृदयाशी शर्यंत्र असे रचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....


गैरसमज तिच्या मनात एवढे कसे साचले, 

का तिने मन माझे नीट नाही वाचले,
स्वप्नांचे घर माझे काही क्षणांत खचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....


आज तिने माझ्याशी प्रेमाचे नाते तोडले,
प्रेमाच्या वाटेवर आणून अर्ध्यात सोडले,
तिच्या आठवणींचे काही क्षण मी आता वेचले, 

पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले, 
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले..... 

आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....♥♥♥

Friday, 12 October 2012

अजुन नाही शिकलो

अजुन नाही शिकलो............

आजपर्यंतच्या प्रवासात
अनेक गोष्टी शिकलो

विचार करायला शिकलो

भर दिवसा स्वप्नं बघायला शिकलो

अनेकदा अडखळूनहि पुन्हा
स्वत:ला सावरायला शिकलो

स्वत:साठी जगता जगता
दुसऱ्यांसाठी जगायला शिकलो

शब्दांचे अर्थं समजुन घेऊन
कविता लिहायला शिकलो

छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंदीत व्हायला शिकलो

स्वत:ला समजुन घेता नाही आले तरी
दुसऱ्यांना ओळखायला शिकलो

एवढे शिकुनही अत्तापर्यंत
"प्रेम" करायला नाही शिकलो............

----Unknown

* निस्वार्थ प्रेम *

 प्रविना: हो अनिकेत, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला
होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "

अनिकेत:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"


प्रविना:- " राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Aniket ........!!


(10 दिवसांनतर)



राहुल:- " प्रविना एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......


तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,

त्या पत्रात लिहिले होते की, "प्रविना मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"